*कोकण Express*
*इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला कडून गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप*
*वेंगुर्ला ःःप्रतिनिधी*
आज दिनांक ०२.०७.२०२२ रोजी गोगटे मंगल कार्यालय वेतोरा येथे गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमास क्लब अध्यक्ष सौ.ज्योती देसाई, सेक्रेटरी सौ.स्मिता दामले, उपाध्यक्ष सौ.अफशान कौरी,आय.एस.ओ.सौ.वॄंदा गवंडळकर , सदस्य सौ.श्रिया परब , विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांत गरजु होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.यामध्ये युवराज सुशांत राऊळ , किमया राजेश मळेकर , आयुष दत्ताराम राऊळ , अर्थव समीर सातार्डेकर , दिपीका सुरेन्र्द मेस्त्री , सार्थक रमेश करंकुटकर , चंद्रकांत प्रकाश अणसुरकर , संचिता बाळा राऊळ , सोहंम बाबु गावडे , झिलु सरमळकर , वाॅरन डिसोजा , दिक्षा वराडकर , मानसी राऊळ व निता सातार्डेकर इत्यादींचा सामावेश होता.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मिता दामले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ ज्योती देसाई यांनी केले.