*कोकण Express*
*परफेक्ट अकॅडमी कुडाळ कडून जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री उमेश तोरस्कर यांचा सत्कार*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये जेईई आणि नीट च्या उज्वल निकालांसाठी चर्चेचा विषय असणारी परफेक्ट अकॅडमी कुडाळ यांच्यामार्फत आज दि.1 जुलै रोजी,11 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.उमेश तोरस्कर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परफेक्ट अकॅडमी चे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, परफेक्ट अकॅडमी चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राध्यापक राजाराम परब म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी परफेक्ट अकॅडमी गेली पाच वर्षे कार्यरत आहेत, पण त्याशिवाय परफेक्ट अकॅडमी सिंधुदुर्ग च्या सर्वांगीण विकासासाठी देखील कटिबद्ध आहे. शैक्षणिक कार्य सोबतच समाजातील इतर घटकांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. परफेक्ट अकॅडमी एक्सलन्सी अवॉर्ड सोहळा, परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून महासंजीवनी मेडिटेशन चा कार्यक्रम या सर्व गोष्टी कुठे ना कुठे सिंधुदुर्ग च्या सर्वांगीण विकासासाठी मदतशील ठरणारे आहेत. सिंधुदुर्ग चे सर्व पत्रकार मित्र यांनी नेहमीच परफेक्ट अकॅडमी चे काम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले योगदान दिले आहे. याचाच भाग म्हणून बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित अध्यक्ष श्री तोरस्कर यांचा सत्कार आपण येथे आयोजित करत आहोत.
सत्कारानंतर श्री उमेश तोरस्कर म्हणाले, “मागची 35 हुन अधिक वर्ष मी पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे, गेले तीन वर्षे पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणीवर आहे, आणि कदाचित याचीच दखल घेत आज आमच्या सर्व कार्यकारणीची बिनविरोध निवड झालेली आहे. आपण आपल्या कार्यकालामध्ये सर्वसामान्य पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तर करूच, पण परफेक्ट अकॅडमी सारख्या चांगल्या संस्था ज्या समाजाच्या विकासासाठी झटत आहेत त्यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न देखील करू.
प्राध्यापक राजाराम परब यांनी मानाची शाल, पुष्पगुच्छ भेट वस्तू, तसेच परफेक्ट अकॅडमी चे सन्मानचिन्ह अध्यक्षांचा सत्कार केला.सदर कार्यक्रम परफेक्ट अकॅडमीच्या यशोधरा कुडाळ येथील कार्यालयामध्ये पार पडला.

