*कोकण Express*
*मोठमोठी किती नावे आली तरी नुसत्या नावाने नराचा नारायणा होत नाही, त्याला जोड लागते मेहनतीची चिकाटीची आणि परफेक्शनची : प्राध्यापक राजाराम परब*
गेल्या पाच वर्षात प्रवेश परीक्षांमधील निकालांमध्ये सिंधुदुर्गाचे नाव राज्यातच नव्हे तर देशाच्या पटलावर आणणारी नीट, जेईई, एम एच सीइटी, या परीक्षांसाठी सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा येथील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मागील चार वर्षात परफेक्ट अकॅडमी आणि परफेक्ट अकॅडमीच्या टीमने अतिशय मेहनतीने जेमतेम 15 विद्यार्थ्यांपासून सुरुवात करून अडीचशे हून अधिक विद्यार्थ्यांचा टप्पा गाठला आहे. गतवर्षीच्या निकालांमध्ये परफेक्ट अकॅडमी चा आठ विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेत 90 टक्के होऊन अधिक गुण मिळवले, तर परफेक्ट अकॅडमीच्या साहिल अटक याला आयआयटी भुवनेश्वर येथे प्रवेश मिळाला. तसेच सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयामध्ये तीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन, परफेक्ट अकॅडमी ने आपल्या नीट रिझल्ट्स चा ही धसधाशीत पुरावा दिला. शिवाय एम एच सीईटी या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान परफेक्ट अकॅडेमीच्या गौरव नाईक, भुपेंद्र जामले आणि कृष्णा चव्हाण या विद्यार्थ्यांनी मिळवला. शिवाय प्रवेश परीक्षांसोबत बारावी स्टेट बोर्डाचे तयारी होऊ शकत नाही, असे म्हणणाऱ्यांना देखील परफेक्ट अकॅडमीच्या दीक्षा तोंडवळकरने सिंधुदुर्गातच नव्हे तर समस्त कोकण विभागात बारावीत पहिले येत सडेतोड उत्तर दिले आहे.
परफेक्ट अकॅडमीच्या यशाबद्दल परफेक्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांच्याशी संवाद साधला असता ” परफेक्ट अकॅडमी फक्त एक कोचिंग सेंटर नसून ती एक चळवळ आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहेत पण त्याशिवाय गुणवत्तेचाही इथे अभाव नाही हे आम्ही परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून सिद्ध केले आहे,त्यामुळे परफेक्ट अकॅडमी व्यावसायिकतेच्या पुढे जाऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला एज्युकेशनल टुरिझम बनवण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे, मला मार्गदर्शनाअभावी आयआयटीमध्ये बीटेक साठी प्रवेश मिळाला नाही पण कशा मार्गदर्शनाच्या अभावाने इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही अतिशय माफक फी मध्ये जेईई, नीट, एमएच-सीईटी या परीक्षांचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करतो.. दरम्यान कितीतरी मोठी नावे आणि प्रलोभने विद्यार्थ्यांना जरी आली तरी त्यांना माहित आहे की मोठ मोठ्या नावाने किंवा जाहिराती करून नराचा नारायणा होत नाही गरज आहे कडव्या शिस्तीची, चिकाटीची, सातत्याची आणि परफेक्ट अकॅडमी सारख्या विश्वसनीय मार्गदर्शनाची.
सध्या आमच्या अकरावीच्या नवीन दोन बॅचेस पूर्ण भरले असून अकरावीच्या तिसऱ्या बॅचमध्ये निवडक जागा शिल्लक आहेत, त्याचा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन परफेक्ट अकॅडमी चे संचालक प्राध्यापक राजाराम परब यांनी केले आहे.

