नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लि . ( N S D L ) कंपनी कडून आदर्श विद्यालय करंजेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लि . ( N S D L ) कंपनी कडून आदर्श विद्यालय करंजेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

*कोकण Express*

*नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लि . ( N S D L ) कंपनी कडून आदर्श विद्यालय करंजेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप*

*कासार्डे  ः संजय भोसले*

तांबे एज्युकेशन सोसायटी संचलित , करंजे – नागवे – साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना दि . १ जुलै २०२२ रोजी नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड ( N S D L ) या कंपनीच्या वतीने मोफत शालेय दप्तर , वह्या , पेन , कंपास , आलेख वही आदी शालेय साहित्य कंपनीचे पदाधिकारी मा . योगेश लाड ( AVP , NSDL) , मा. प्रसाद जंगम (CSR . NSDL) यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी प्रशाला मुख्याध्यापक मा . एस . डी . चोडणकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून शाळेच्या उपक्रम व वाटचाली विषयी माहिती देऊन कंपनीला धन्यवाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली .उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासा विषयक मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर शैक्षणिक मदतीसाठी नागवे गावचे उद्योजक मा विष्णू सातवसे यांचे सहकार्य लाभले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री . जी . एस परब सर तर आभार सौ .एन . एन . राणे यांनी मानले .यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!