*कोकण Express*
*राज्यातील ‘जलक्रीडा’ (Water Sport) सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली -अस्लम शेख*
*सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या जलक्रिडा व्यवसायिकांनी घेतली मंत्री अस्लम शेख यांची भेट झाली सकारात्मक चर्चा*
*मुंबई, दि.०७ :*
राज्यातील जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याचे आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रिडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रिडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत निवेदन दिले.
श्री. अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडेसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रिडा व्यवसायाशी (Water Sport) निगडीत विविध परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले.
श्री. अस्लम शेख म्हणाले की, महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. राज्य सरकारचा बंदरे विभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस चे महिंद्र सावंत, अरविंद मोंडकर, राजन कुमठेकर, मनोज खोबरेकर, गोपाळ चोपडेकर, अन्वय प्रभू, मनोज मेथर, सचिन पराडकर, अमृत राऊळ, सन्मेष परब, हेमंत चिंदरकर, केतन तोरसकर, स्वप्नील मोंडकर, अरविंद खानविलकर, संजय मयेकर, समीर सारंग, पांडू कुमठेकर, विकी खोबरेकर, भूषण मयेकर, प्रीतम मयेकर, प्रशांत मळेकर, प्रमोद डोर्लेकर, विशाल साखळे,राजेश नाईक, दत्तराज कोरगावकर, नरहरी परब, शंकर मुंबरकर, शैलेंद्र सावजी, संतोष शेलटकर व इतर जलक्रीडा व्यावसायिक उपस्थित होते
