*कोकण Express*
*फोंडाघाट न्यू. इंग्लिश स्कूल एस एस सी १९८९-९० बॅच माजी विद्यार्थी आचरा जामुडल रिसॉर्ट मध्ये स्नेहमेळावा!*
*३४ वर्षांनी भेट, मित्र मैत्रिणींचे चेहरे आनंदाने फुलले*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
फोंडाघाट न्यू. इंग्लिश स्कूल एस.एस.सी माजी विद्यार्थी १९८९-९० बॅचचा स्नेहमेळावा आचरा येथे आनंदमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. ३४ वर्षांनी एकमेकांना मित्र मैत्रिणी भेटल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. सर्वप्रथम हायस्कूल मध्ये शिक्षकांची भेट घेतली.नंतर ऐकत्रित हॉल मध्ये जमा होऊन राष्ट्रगीत म्हटले त्यानंतर सर्वजण आचरा येथे जामुडल रिसोर्ट ला गेले सर्व मित्र मैत्रिणींनी फ्रेश होवून दुपारचे भोजन घेऊन आराम करून संध्याकाळी हॉल मध्ये जमा होऊन कार्यक्रमाची सुरवात केली.सर्वांनी एकमेकांचा परिचय करून दिला.प्रत्येकानी आपले मनोगत मांडले मनोगत दरम्यान काहींनी ३४ वर्षाच्या प्रवासातील कटू व गोड अनुभव कथन करून हसवले आणि रडवलेही. त्यानंतर संगीत खुर्ची, रेकॉर्ड डान्स, आईचा रुमाल हरवला व काही गेम्स खेळून सर्वांनीच मनसोक्त आनंद लुटला हा कार्यक्रम संपल्यावर रात्रीच्या भोजनाचा स्वाद घेतला.त्यानंतर रंगली गाण्याची मैफिल, विडंबन, काव्य, किस्से आणि वात्रटीका. त्या रात्री रिसॉर्ट ला वस्ती टाकून आराम केला.
स्नेहमेळावा दुसरा दिवस उजाडला सकाळीच लवकर उठून आचरा बीच वर फिरण्याचा मौज मजा खेळ खेळण्याचा व पोहण्याचा आनंद लुटला .नंतर डेनी फर्नाडीस यांचे जामुडल रिसोर्ट ला जाऊन फ्रेश झाले. ३४ वर्षांनी जुने मित्र मैत्रिणी भेटणार म्हणून सर्वानाच स्नेहमेळाव्याची प्रतीक्षा होती कुणी येताना फणस, भाकरवडी तर कुणी फरसाण आणि चिकी आणली होती मजा मस्ती, गप्पा, गाणी, खाणे पिणे यात दोन दिवस कधीच सरले कळले नाही
यात प्रामुख्याने संजय हळदिवे,संतोष पावसकर,मनीष गांधी, कौस्तुभ रेडकर , दीपक इस्वलकर, शिवाजी पवार,विठोबा म्हस्कर, राजेश मोरये,दत्तात्रय नातू,शैलेंद्र आपटे,शरद पवार,रमाकांत जाधव,जयवंत जाधव,प्रमोद भोगटे,सुनील नानचे,गणेश पारकर, राजू कुबल, संतोष शिवगण,राजा पेडणेकर,साक्षात पारकर,सुनील कदम, विवेक ठाकूर,मंगेश डोंगरे,विद्याधर सावंत,विजय गावकर, सुभाष गवंडी,भाई हर्लेकर, विनोद मरये,तसेच शोभा चिके,मीना म्हस्कर, तनुजा भोगटे, नीता सावंत, दीपाली कुलकर्णीं, जयश्री भानुशाली, दीपाली रेडकर, रुपाली रेवडेकर, सुलभा मोदी, रोहिणी भाकरे, प्रज्ञा कदम, विद्या सावंत यांनी सहभाग घेतला.