*कोकण Express*
*सिंधुफिल्मसिटीसाठी राज्य सरकारने 300 कोटी मंजूर करावेत……..*
*लावण्यसिंधू चित्रपट संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा 1997 साली देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही आवश्यक सोयीसुविधा निर्माण झालेल्या नाहीत. जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच सिंधुफिल्मसिटी निर्माण झाल्यास प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील. त्यासाठी राज्य सरकारने सिंधुफिल्मसिटी उभारण्यासाठी सुरवातीला 300 kकोटींचा निधी मंजूर करावा अशी मागणी लावण्यासिंधू चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी शासनाकडे केली आहे.
महाराष्ट्राची शान असलेल्या आणि हजारो कोटींचा रोजगार मिळवून देणारा मुंबईतील फिल्मसिटी उद्योग उत्तरभारतमध्ये नेण्यासाठी उत्तरभारातचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबई दौंरा केला. यावेळी त्यांनी अनेक फिल्म निर्मात्याशीही चर्चा केली. सुशांतसिह आत्महत्या प्रकरणानंतर मुंबईतील फिल्म उद्योगाबाबत अनेक चर्चाना उधाण आले होतें. परंतु कोकणची नाळ असलेल्या मुंबईतील फिल्म उद्योगास अधिक सशक्त बनविण्यासाठी कोकणच्या निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या सिंधुदुर्गात सिंधुफिल्मसिटी निर्माण करण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्याच्या समुद्रकीनारपट्टीचा फिल्म शूटिंगसाठी फारमोठा लाभ घेता येईल. नव्याने सिंधुदुर्गात होणाऱ्या विमानसेवेचा आणि रेल्वेचाही लाभ या उद्योगस होईल. तसेच सिंधुदुर्गच्य पर्यटन वाढीस अधिक वेग येऊ शकेल. असा विश्वास श्री. उपरकर यांनी व्यक्त केला आहे.
मात्र राज्य सरकारने सिंधुफिल्मसिटी करिता जमीन खरेदीसाठी सुमारे 100 कोटी व इतर अनुषंगिक सुविधा उभारणीसाठी सुमारे 200कोटी निधी मंजूर करणे आवश्यक आहे. भविष्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेले अंग्रीया बँक प्रकल्प, मरीन पार्क, सिवर्ल्ड प्रकल्प,पंचतारंकित हॉटेल प्रकल्प यामुळे सिंधुफिल्मसिटी प्रकल्प सिंधुदुर्गास वरदान ठरू शकेल. शिवाय हा प्रकल्प सहकारी तत्वावर गुंतवणूक करून उभारल्यास गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येईल.