नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ

*कोकण Express*

*नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शहरातील दोन विकास कामांचा शुभारभ करण्यात आला.यामध्ये बॅ.खर्डेकर रोड येथील जुन्या खारलँड ऑफिस जवळील धोकादायक पुलाचे नुतनीकरण आणि कॅम्प-गवळीवाडा येथील भैरट यांच्या घरापर्यंत जाणा-या पायवाटेचे सिमेंटीकरण आदींचा समावेश आहे. या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक शितल आंगचेकर, कृपा गिरप, प्रशांत आपटे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, नगरअभियंता अभिषेक नेमाणे, रचना सहाय्यक प्रितम गायकवाड, नागरीक रफीक शेख, अस्लम शेख, कांता भैरट, प्रितम सावंत, जॉन्सन फर्नांडीस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!