*कोकण Express*
*श्री आदिष्टी देवी विकास सेवा सोसायटी खांबाळे चेअरमनपदी प्रविण गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी जगदीश पवार यांची बिनविरोध निवड*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
श्री आदिष्टी देवी विकास सेवा सोसायटी खांबाळेची निवडणूक ग्रामस्थांच्या एकोप्याने राजकिय विरहित आदिष्टी देवी सहकार पॅनेलच्या माध्यमातून ही बिनविरोध केली होती. या सोसायटीच्या चेअरमनपदी प्रविण गायकवाड आणि व्हाईस चेअरमनपदी जगदीश पवार यांची सर्व संचालकांच्या मधून बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांचे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी माजी चेअरमन दीपक चव्हाण, सुनिल पवार, नवनिर्वाचित चेअरमन प्रवीण गायकवाड, व्हाईस चेअरमन जगदीश पवार, उपसरपंच गणेश पवार, राजाराम वळंजू, रुपेश कांबळे, महेश चव्हाण, प्रसाद कदम, प्रकाश लांजवळ, पुजा लवू पवार, स्नेहलता प्रभाकर पवार, गंगाराम अडुळकर या सर्व संचालकांसह सोसायटी सचिव सिद्धेश रावराणे, माजी सभापती शुभांगी पवार, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य लवू पवार, जेष्ठ ग्रामस्थ सदानंद वासुदेव पवार आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सुनिता आशिष भोगले यांनी काम पाहिले. तसेच निवडणूक अधिकारी भोगले यांनी सोसायटी बिनविरोध केल्याबद्दल खांबाळे गावातील सेवा सर्व ग्रामस्थांचे, नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.