*कोकण Express*
*राष्ट्रीय जंतनाशक दिन यशस्वी राबवूया*
*अखंड भारत सदृढ बनवूया ; डाॅ .पी. एम. इंगवले*
*कासार्डे ः संजय भोसले*
स्वच्छतेचे महत्त्व जरी लोकांना पटले असले तरी अजून आरोग्याच्या बाबतीत जनमानसात खूपच जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. आता लोक बाहेर शौचास जात नसले तरी अनवाणी फिरणे, मातीशी वारंवार संपर्क येणे याद्वारे जंतांचा आपल्या शरीरात प्रवेश होत असतो. मानवी पोट हे सर्व आजारांचे माहेरघर असून जंतांचे आश्रयस्थानही आहे. विशेषता लहान मुलांना जंतांचा प्रादुर्भाव जास्त होत असून ,भूक मंदावणे ,कातडीचे आजार होणे, इत्यादी प्रकार घडतात. म्हणून शासनामार्फत प्रत्येक वर्षी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवली जाते. यात आपले महत्त्वाचे योगदान देऊन अखंड भारत सदृढ करूयात असे आवाहन कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पी .एम. इंगवले यांनी केले .
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेअंतर्गत आयोजित केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सभागृहात मार्गदर्शन शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी वैद्यकीय अधिकारी एस .एस .पालांडे, समुदाय आरोग्य अधिकारी तळेरेचे डी .व्ही .जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी कासार्डेचे श्रीमती कुकडे ,आरोग्य सहाय्यक एस .एम .सावंत ,आरोग्य सेवक जी .के .तेली ,आरोग्य सेवक एन. एम. सावंत, आरोग्य सेविका किर्लोस्कर ,गटप्रवर्तक एस.एस.रासम,परिचर अमोल जमदाडे .इत्यादी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देताना जंतांचा प्रकार, त्यांच्या प्रसाराचे चक्र, जंत संसर्गाची लक्षणे, जंताचा होणारा परिणाम ,जंत संसर्ग कसा थांबवावा, जंत संसर्गा वरती होणारे उपचार ,जंतनाशकाचे फायदे , सामाजिक जागरूकता व संघटन, जंतनाशक गोळीचे दुष्परिणाम व त्याचे व्यवस्थापन. इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व कासार्डे परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने प्रशिक्षण शिबीराला उपस्थित होते.

