*कोकण Express*
*उपजिल्हा रुग्णालय कणकवलीत उद्या २२एप्रिल रोजी भव्य मोफत आरोग्य मेळावा*
*कासार्डे :संजय भोसले*
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार 22 एप्रिल रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे सर्व रोग मोफत तपासणी तज्ञ डॉक्टरां मार्फत केली जाणार असून तालुक्यातील गर्जुनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्यचिकित्सक यांचे मार्फत करण्यात आले आहे.
या मेळाव्यात वेगवेगळ्या रोगावर मोफत तपासणी करून उपचार केले जाणार आहेत .यामध्ये हृदयरोग, मधुमेह ,रक्तदाब, मेंदूचे आजार, कॅन्सर गरोदर माता व, स्त्री-तपासणी ,लहान मुलांचे आजार ,किडनी आजार, मोतीबिंदू, त्वचा रोग ,गुप्तरोग, कान-नाक-घसा आजार, अस्थीरोग, एचआयव्ही तपासणी, क्षयरोग, दंतरोग ,कुष्ठरोग अशा सर्व आजारांचा समावेश आहे.
याचबरोबर मोफत रक्त व लघवी तपासणी,, एक्स-रे काढणे, ईसीजी ,इत्यादी मोफत केली जाईल .शिवाय गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत दिले जातील .याचबरोबर आयुर्वेद विभागांतर्गत निरोगी जीवनशैली विषयी आहार, योगा व इतर सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच डिजिटल हेल्थ कार्ड आयडी व आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध करून दिले जातील. यासाठी पासपोर्ट साईज दोन फोटो ,केसरी किंवा पिवळे कार्ड ,आधार कार्ड, मतदान ओळखपत्र ,इत्यादींच्या मूळ कागदपत्रासह प्रत्येकी दोन झेरॉक्स प्रती आणि ओटीपी साठी मोबाइल सोबत असणे गरजेचे आहे .असे वैद्यकीय अधिकार्यां मार्फत कळविण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त गरजूनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका वैद्यकिय तधिकारी कणखवली यांचे मार्फत करण्यात आले आहे.

