केसरकरांनी बँंकेतील बोगस भरती आणि बँंकेचे गैर कर्ज वाटप केल्या प्रकरणी चौकशीची मागणी करून संचालक मंडल बरखास्त करावे

केसरकरांनी बँंकेतील बोगस भरती आणि बँंकेचे गैर कर्ज वाटप केल्या प्रकरणी चौकशीची मागणी करून संचालक मंडल बरखास्त करावे

*कोकण Express*

*केसरकरांनी बँंकेतील बोगस भरती आणि बँंकेचे गैर कर्ज वाटप केल्या प्रकरणी चौकशीची मागणी करून संचालक मंडल बरखास्त करावे*

*…तरच आपण एक कर्तबगार गृहमंञी होता हे जनता मान्य करेल*

*भाजपा राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

धुतल्या तांदळा सारखे असणार्या दिपक केसरकरांनी स्वपक्षातील असलेलया सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष असलेल्या शिवसेनेचे कोणतेही पद नसलेल्या सतिश सावंत यांना बँंकेतील बोगस भरती आणि बँंकेचे गैर कर्ज वाटप केल्या प्रकरणी  खुर्ची खाली करणयाचे आदेश देवून सहकार मंत्र्यांकडे बँंकेची खाते निहाय चौकशीची मागणी करून संचालक मंडल बरखास्त करावे आणि नंतरच आदरणीय राणे साहेबांवर टीका करावी. तरच दूध का दूध पानी का पानी होईल तरच आपण एक कर्तबगार गृहमंञी होता हे जनता मान्य करेल .आपण खरोखरच स्वच्छ आणि पाच वर्ष चांगले काम करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास केला असे म्हणत असाल तर आल्या पंक्तीत बसत असलेल्या प्रभारी अध्यक्ष असलेल्या सतीश सावंत आणि संचालक मंडळाला त्वरीत राजीनामा देणयास भाग पाडावे तरच आपल्याला कर्तव्यदक्ष केसरकर म्हणतील नाहीतर आपली टीका महणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात.  आपण जनते समोर तोंडावर आपटणार आहात आणि आपले खरे रूप व बोलबच्चन आणि भावनीक बनवून जनतेला वेढे बनवणारे केसरकर म्हणून आपण गेले नऊ महीने जिल्ह्यात नसताना आपला कोरोना योद्धा महणून जनता सत्कार करतील कारण आपण गेली वर्षभर जिल्ह्यात नव्हता आणि आता आलात आणि कोणतेही काम न करता फक्त टीका करत आहात तरी आपण त्वरीत संचालक मंडळ बरखास्त करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!