*कोकण Express*
*साळीस्ते शाळा नं. १ मध्ये विद्यार्थी, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांचा गुणगौरव सोहळा संपन्न*
*कासार्डे : संजय भोसले*
भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय दिपक पांडुरंग गुरव यांच्या स्मरणार्थ कुमार ओमकार दीपक गुरव यांनी साळिस्ते नंबर एक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच गावातील सामाजिक, शासकीय कार्यकर्ते, ग्रामसेवक ,पोस्टमन ,वायरमन, पत्रकार यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन आणि विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गुणगौरव केला. आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या .
मुलांमध्ये वेगवेगळे गुण निर्माण व्हावे ,विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक द्विगुणीत व्हावा. आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी गावचे नावलौकिकात अधिक वाढ करावी. या उद्देशाने संघटनमंत्री ओमकार गुरव यांनी स्वर्गीय दिपक गुरव यांच्या स्मरणार्थ या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख म्हणून उपस्थितात भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सत्यविजय जाधव, जिल्हा संघटनमंत्री ओंकार गुरव, विभाग प्रमुख श्री.पाताडे , केंद्रप्रमुख गोपाळ जाधव,श्री. सद्गुरु कुबल, मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर ,शिक्षक श्री. पास्ते श्री.पारधीये ,श्रीमती वळवी ,श्रीमती बुचडे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष ताम्हणकर ,संतोष पाष्टे, भारतीय मजदूर अध्यक्ष साळीस्तेगावचे लक्ष्मण ताम्हणकर ,चंद्रकांत हरियाण, अंगणवाडी सेविका दिपाली गुरव, स्वाती ताम्हणकर, प्रेमलता गुरव, गिरीश कांबळे, वैभव कांबळे, मंगेश कांबळे ,समीर कुलकर्णी. इत्यादी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.या सर्वानी सदर सोहळ्याची शोभा वाढवली. तर संघटनमंत्री ओमकार गुरव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

