*कोकण Express*
*फोंडाघाट सोसायटी निवडणूकीत शिवसेनेने एकतर्फी धुव्वा उडवला*
*संजय आग्रे यांच्या रणनीती समोर भाजपच्या पॅनलची हार*
*13 पैकी 9 जागांवर शिवसेना तर 4 जागांवर भाजपा विजयी*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
तालुक्यातील लक्षवेधी फोंडाघाट विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सहकार पॅनेल ने भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनेल चा एकतर्फी धुव्वा उडवला आहे. आज झालेल्या सोसायटी निवडणुकीत 13 पैकी 9 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून भाजपला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 942 पैकी 793 मतदारांनी मतदान केले. माजी जि. प. सदस्य संजय आग्रे हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. फोंडाघाट सोसायटी निवडणूक ही भाजपा आणि शिवसेनेच्या वतीनेही अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. दोन्ही बाजूनी एकतर्फी विजयाचा दावा केला जात होता.

माजी जि. प. सदस्य संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पॅनल ने तर माजी पं. स. सदस्य बबन हळदीवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पॅनल ने ही निवडणूक लढवली. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पुरी रसद पुरवूनही संजय आग्रे यांच्या रणनीती समोर भाजपच्या पॅनल ला हार पत्करावी लागली. शिवसेनेचे संजय आग्रे, संदेश पटेल, राजन नानचे, सुभाष सावंत, सचिन तायशेट्ये, श्रद्धा सावंत, नागेश कोरगावकर, दुर्वा गोसावी, सुभाष जाधव हे उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे राजन चिके, बबन हळदीवे, हेमंत राणे, तन्वी मोदी हे 4 उमेदवार विजयी झाले.


