मुंबईहून आलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना  तब्बल ३ तास स्वँब कलेक्शन सेंटरवर ठेवले ताटकळत

*कोकण Express*

*मुंबईहून आलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना  तब्बल ३ तास स्वँब कलेक्शन सेंटरवर ठेवले ताटकळत….*

*एसटी वाहक व चालकाचां प्रशासना विरोधात तीव्र संताप*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

गेली पंधरा दिवस मुंबई-ठाणे येथे सेवा बजावलेल्या एसटी चालक-वाहकांना कणकवलीत स्वँब कलेक्शन सेंटरवर स्वँब घेण्यासाठी बोलविण्यात आले.मात्र त्यांना तब्बल ३ तास ताटकळत राहावे लागले. या स्वँब कलेक्शनच्या ठिकाणी असलेले आरोग्य कर्मचारी १२ वाजता बंद करुन बाहेर गेले होते. त्यामुळे एसटीचे कर्मचारी त्या ठिकाणी येऊन तीन ते चार तास थांबले होते. अखेर एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे स्वँब घेण्यासाठी विनंती केली. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता देण्या-घेण्याची सुरुवात करण्यात आली. मात्र या सगळ्या कारभाराविरोधात एसटी वाहक व चालकानी प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आक्रोश केला.

कोरोना महामारीत असल्यामुळे सिंधुदुर्गातील कर्मचारी मुंबईतील बेस्टची सेवा बजावण्यासाठी जात आहेत.कणकवली आगारातून ८० कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टची सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात आले होते. गेली १५ दिवस सेवा बजावून हे कर्मचारी रविवारी दुपारी १२ वाजता कणकवली शासकीय विश्रामगृह येथील स्वँब कलेक्शन सेंटर येथे आले होते.या ठिकाणी आल्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी नसल्याने एसटी प्रशासनाने त्यांना उद्या घेण्यासाठी या, असे सूचित केले.त्या वेळी संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा स्वँब घ्यावेत.नाहीतर आमचा जीवितास धोका आहे, आमचे कुटुंबीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकेल.त्यामुळे पहिल्यांदाच शोध घ्या अशी मागणी केली.

त्यानंतर एसटी प्रशासनाच्या मदतीने आरोग्य विभागाचे कर्मचारी आल्यानंतर स्वँब घेण्यात आले. या कालावधीत एसटी चालक व वाहक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.एसटी कर्मचाऱ्यांच्या असंतोष यानंतर एसटी प्रशासनाने सायंकाळी ४ वाजता भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तोपर्यंत ते सर्व कर्मचारी ताटकळत बसले होते.काल रात्री १० वाजल्यापासून प्रवास करत मुंबई ते कणकवली ते आलेले आहेत. या सर्व घटनाक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!