*भाजपा चे कोकण व गोवा राज्याचे संघटन मंत्री सतिशजी धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्याची भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न*

*भाजपा चे कोकण व गोवा राज्याचे संघटन मंत्री सतिशजी धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्याची भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न*

*कोकण Express*

*भाजपा चे कोकण व गोवा राज्याचे संघटन मंत्री सतिशजी धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्याची भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न*

*भाजपा स्थापना दिनानिमीत्त ६ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत “अभिमान अभियान ” प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये आयोजित करावे — जिल्हाध्यक्ष राजन तेली .

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

वेंगुर्ले भाजपा ची संघटनात्मक बैठक कोकण व गोवा राज्याचे संघटन मंत्री सतिशजी धोंड , जिल्हाध्यक्ष राजन तेली , रत्नागिरी – सिंधुदुर्ग संघटन मंत्री शैलेंद्रजी दळवी , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाली .
मान.राष्ट्रीय अध्यक्षांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ६ एप्रिल – भाजपा स्थापना दिवस ते १० एप्रिल ” अभिमान अभियान ” प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये मोठ्या उस्ताहाने साजरे करावे. तसेच १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती हे दोन्ही कार्यक्रम बुथस्तरावर आयोजित करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले . तसेच बुथरचना व शक्ती केंद्र सक्षम बनवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . भाजपा स्थापना दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार प्रत्येक बुथ वर पोहचवण्यासाठी नियोजन करण्यात आले . तसेच स्थापना दिनानिमीत्त प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर तसेच सार्वजनिक ठिकाणी पक्षाचे झेंडे उभारणेबाबत नियोजन करण्यात आले .
या बैठकीमध्ये पक्षाने दिलेले कार्यक्रम कशाप्रकारे राबविण्यात आले या बाबत आढावा घेतला , तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन की बात ” कार्यक्रमाची माहिती घेण्यात आली . तसेच संघटनात्मक बांधणीच्या द्रुष्टीने पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले .
या बैठकीस जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , महीला मोर्चा ता.अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके व अॅड सुषमा खानोलकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत व वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , नगरसेवक प्रशांत आपटे व धर्मराज कांबळी , नगरसेविका साक्षी पेडणेकर व श्रेया मयेकर व कृपा मोंडकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , परबवाडा सरपंच व अॅप संयोजक पपु परब , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर व नारायण कुंभार , महिला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर , शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक – सुधीर गावडे , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , बुथप्रमुख शेखर परब इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!