*कोकण Express*
*सावंतवाडी तालुक्यातील अनधिकृत चिरे उत्खनन आणि अनधिकृत क्वारी क्रशर वेळीच थांबवा*
*अन्यथा उत्खनन होणाऱ्या ठिकाणी जन आंदोलन छेडू – असा इशारा मनसे चे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर यांनी प्रशासनल दिला*
सावंतवाडी तालुक्यातील अनेक ठिकाणी अनधिकृत चिरे उत्खनन आणि अनधिकृत क्वारी क्रशर चालू आहे असे निदर्शनास आले आहे. यांची दखल प्रशासन घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनने तेथील अनधिकृत उत्खनन वेळीच थांबवावी. अन्यथा जेथे असे उत्खनन चालू आहे तिथे जनतेला घेऊन जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर यांनी दिला आहे. अनधिकृत चिरे उत्खनन आणि क्वॉरी क्राशर ठिकाणी मनसे उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर यांनी पाहणी केली असता अनेक ठिकाणी अनधिकृत असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी क्वेरी क्रशार चालू आहे त्या ठिकाणी मानव वस्ती असल्याने तेथील घराना तडे जाऊन धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी जन आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा प्रसिद्धीपत्रक द्व्यारे श्री. साटेलकर यांनी दिला आहे.

