युवासेनेकडून आदित्य ठाकरेंचे आदरातिथ्य!* *युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले स्वागत

युवासेनेकडून आदित्य ठाकरेंचे आदरातिथ्य!* *युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले स्वागत

*कोकण Express*

*युवासेनेकडून आदित्य ठाकरेंचे आदरातिथ्य!*

*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले स्वागत…!*

*युवासेनेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे उत्साहाचे वातावरण…!*

*देवगड ः प्रतिनिधी*

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी युवासैनिकांच्या वतीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे देवगड येथील कुणकेश्वर तिठा एमटीडीसी येथे देवगड हापूस आंब्यांचा हार घालत सन्मानचिन्ह भेट देत शुभेच्छा दिल्या.यावेळी ढोल ताशांच्या गजरात स्वागत जंगी स्वागत करण्यात आले.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे युवासेनेमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.आदित्य ठाकरेंचा विजय असो…कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला…शिवसेना झिंदाबाद अशा घोषाणां देत परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, देवगडसह आदित्य ठाकरे यांच्या दौरा असलेल्या मार्गावर सुशांत नाईक यांच्या वतीने स्वागताकरिता कमाणी उभारण्यात आल्या होत्या. तसेच रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावून हा परिसर भगवामय करण्यात आला होता. तर आदित्य ठाकरे यांचे देवगड येथील कुणकेश्वर तिठा एमटीडीसी येथे स्वागत केल्यावर तेथून नियोजित कार्यक्रम स्थळी ठाकरे यांच्या सोबत युवासेनेच्या कार्याकर्त्यांचा ताफापुढे मार्गस्थ झाला.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख ललित घाडीगावर, समन्वयक गुरू पेडणेकर, जिल्हा समन्वयक राजू राठोड, युवा सेना शहर प्रमुख आदित्य सापळे, सोहम वाळके, अमित मयेकर, विभाग प्रमुख सिद्धेश राणे, शरद सरंगले, आबु सेस्त्री, संजय सावंत, श्री.हडकर,सचिन आचरेकर,परेश आचरेकर,आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते. कणकवली शहर प्रमुख आदित्य सापळे,देवगड प्रमुख सौरभ माने,उपशहर प्रमुख कणकवली सोहम वाळके,अमित मयेकर,विभाग प्रमुख सिद्धेश राणे,खारेपाटण विभाग प्रमुख तेजस राऊत,आकाश गुरव,गणेश वाळके,शरद सरंगले,आबु सेस्त्री,संजय सावंत, सचिन आचरेकर,परेश आचरेकर,भूषण कोळसुलकर,रोहित रावराणे,सिद्धेश मानगावकर,गणेश गावकर,दिनेश वाळके, भूषण परुळेकर,रिमेष चव्हाण, विनाकय हडकर,फरिद काझी आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!