*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयाचे गांगोवाडी येथे एन.एस.एस. शिबिराचे आयोजन*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी शिबिर गुरुवार दिनांक २४/३/२०२० ते ३०/३/२०२० या कालावधीत गांगोवाडी फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आरोग्य तपासणी, श्रमप्रतिष्ठा, सहजीवन, स्वच्छता, समाजसेवा, व्यक्तिमत्व विकास तसेच विविध शासकीय योजनांची माहिती इत्यादींची जाणीव करुन दिली जाणार आहे. या शिबिराचे उद्घाटन फोंडाघाट येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. सुरेश सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन श्री. सुभाष सावंत असणार आहेत. यावेळी सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. आनंद मर्ये, स्कूल कमिटी चेअरमन दत्तात्रय पवार, महाविद्यालय विकास समितीचे श्री. संदेश पटेल व श्री. केदार रेवडेकर व राजन नानचे यांची उपस्थिती असणार आहे.
दिनांक २५ मार्च रोजी रोटरी क्लब कणकवलीचे सहकार्य आरोग्य तपासणी होणार आहे यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे व डॉ. प्रियंका खरे हे उपस्थित राहणार आहेत. दि.२६ मार्च रोजी स्वामी विवेकानंदांना अपेक्षित आजचा युवक या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. वासिम सय्यद यांचे व्याख्यान होणार आहे. दि .२७ मार्च रोजी व्यक्तिमत्व विकासावर प्रा. डॉ. माराेती चव्हाण व प्रा. डॉ. सुरेश पाटील कणकवली कॉलेज, कणकवली यांचे मार्गदर्शन होणार आहे. २८ मार्च रोजी फोंडाघाट येथील कृषी विद्यावेत्ता श्री. विजय शेटये व मराठे कृषी कॉलेजचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मोहिते यांचे कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना याविषयावर तर ग्रामीण विकासाच्या विविध योजनांबाबत जिल्हा ग्रामाेद्योग अधिकारी श्री. आनंद कर्णिक यांचे २९ मार्च रोजी मार्गदर्शन होणार आहे.
शिबिराचा समारोप दि. 30 मार्च रोजी सायंकाळी तीन वाजता फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस यांच्या अध्यक्षतेखाली हाेणार असून यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. अविनाश सापळे, फोंडाघाट ग्रामविकास अधिकारी श्री. चंद्रकांत चौलकर, फोंडाघाट येथील उद्योजक श्री. रमेश नारकर हे उपस्थित रहाणार आहेत. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे, श्री. संतोष आखाडे, प्रा. डॉ. विद्या माेदी विद्यार्थी प्रतिनिधी प्रणाली महाजन, युवराज भालेकर, ओंकार नेरुरकर हे परिश्रम घेत आहेत.