*कोकण Express*
*प्रा.डॉ. सतीश कामत यांची पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून नियुक्ती*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचे मराठी विभाग प्रमुख तथा प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांना मुंबई विद्यापीठाने मराठी विषयात पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली आहे डॉ. सतीश कामत गेली वीस वर्षे फोंडाघाट महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करीत असून मागील तीन वर्षे ते प्रभारी प्राचार्य म्हणून काम करीत आहेत. त्यांची शिवाजी विद्यापीठामध्ये दलित आत्मकथन या विषयावर पी.एच.डी. असून पाच पुस्तकांचे लेखन केले आहे त्याच बरोबर आठ पुस्तकांचे संपादन ही केले आहे. एकूण तीन लघु संशोधन प्रकल्पाचे काम त्यांनी पूर्ण केले आहे. तसेच विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीवरही काम केले आहे.
त्यांना मिळालेल्या संधीचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यांच्या यशासाठी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.सुभाष सावंत, सेक्रेटरी श्री.चंद्रशेखर लिंग्रस खजिनदार श्री.आनंद मर्ये व सर्व संचालक तसेच महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

