ज्ञानाची शीदोरी घेवून जीवनात यशस्वी व्हावे : अशोक तळेकर

ज्ञानाची शीदोरी घेवून जीवनात यशस्वी व्हावे : अशोक तळेकर

*कोकण Express*

*ज्ञानाची शीदोरी घेवून जीवनात यशस्वी व्हावे : अशोक तळेकर*

*कासार्डे  ः संजय भोसले*

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे आणि माझ्या शाळेत संस्कारक्षम शिक्षण देऊन विद्यार्थ्थांना घडविण्याचे कार्य माझ्या शाळेचे शिक्षक करीत प्रामाणिकपणे करीत आहेत आणि ही ज्ञानाची शिदोरी घेऊन आपण जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन गवाणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक तळेकर यांनी केले.
देवगड तालुक्यातील पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर , गवाणे या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्थांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तळेकर बोलत होते. कार्यक्रमाला शाळा समिती सदस्य गजानन राणे प्रशालेचे मुख्याध्यापक ए. एच्. मुल्ला उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्याध्यापक मुल्ला सर , शिक्षक ए. आर. रुणकर , एस. एच्. बारटक्के व व्ही .आर. प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्थांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अक्षता पोयरेकर , दिक्षिता तोरस्कर , मनिषा परब यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले. नववीच्या वर्गाच्यावतीने पार्थ सावंंत तर आठवीच्या वर्गाच्यावतीने भावेश गोरुले यांनी दहावीच्या विद्यार्थ्थांना परिक्षेसाठी व त्यांंच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुञसंंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार रुणकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!