जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीवर आजपासून प्रशासकीय कारभार सुरू

जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीवर आजपासून प्रशासकीय कारभार सुरू

*कोकण  Express*

*जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीवर आजपासून प्रशासकीय कारभार सुरू*

*सिंधुदुर्ग*

जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर आजपासून प्रशासकीय कारभार सुरू झाला आहे. १३ मार्च रोजी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांची पंचवार्षिक मुदत संपली आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्या-त्या गटविकास अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात पंचवार्षिक मुदती संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. या ठिकाणी मुदती संपल्यानंतर तूर्त चार महिन्यांसाठी प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग या आठही पंचायत समित्यांची मुदत १३ मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे येथे आजपासून प्रशासक कारभार सुरू झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार पुढील चार महिने गटविकास अधिकारी येथे कारभार पाहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!