*कोकण Express*
*उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांची सावंतवाडी तालुका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट*
*सावंतवाडी ःप्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका वतीने आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांची भेट घेतली व तालुक्यातील आरोग्याच्या समस्येवर चर्चा करण्यात आली की सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पुरेसा औषध पुरवठा आहे की नाही याबाबत मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी विचारणा केली यावर वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्याला पाहिजे तेवढा औषध पुरवठा मिळत नाही आम्ही ज्या मागणी करतो तेवढा औषध पुरवठा मिळतो परंतु त्याच्या दुपटीने औषध पुरवठ्याची आवश्यकता आहे आत्तापर्यंत 8000 ऑपरेशन या हॉस्पिटलमध्ये झाली परंतु काही औषधाची कमतरता असते ती बाहेरूनच मागावी लागते त्यामुळे मनसेने या औषधाचा पुरवठा उपजिल्हा रुग्णालयात राज्य सरकार कडून व्हायला पाहिजे त्याच प्रमाणे याठिकाणी अत्यावश्यक म्हणजे सोनोग्राफीची आवश्यकता आहे त्यासाठी टेक्निशियन, रेडिओलॉजिस्ट उपलब्ध शासनाने करून द्यावेत यावेळी डॉ. पाटील म्हणाले की याबाबत आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे मनसेने डॉक्टरांचा कौतुक केलं की हृदयरोगतज्ञ डॉ. अभिजित चितारी, स्त्रीरोगतज्ञ डॉ. दुर्भाटकर, डॉ. वजराटकर यांसारखे डॉक्टर याठिकाणी रात्रंदिवस सेवा देतात खरोखर या सावंतवाडीला ही अभिमानास्पद बाब आहे परंतु त्यांना ज्या लागणाऱ्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध होत नाही. मनसेच्या दणक्यानंतर याठिकाणी याठिकाणी जनित्र, डायलेसिस सेंटर सुरू झाले परंतु या उपजिल्हा रुग्णालयाला हवा त्या रुग्णाच्या संखे मानाने सोयीसुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे रुग्णांना सोनोग्राफीसाठी सिटीस्कॅन साठी बाहेर जावं लागतं या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या तर खऱ्या अर्थाने याठिकाणी गोरगरीब जनतेची सोय होईल असेही गवंडे म्हणाले यासंदर्भात आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेणार आहोत यावेळी मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर, उपतालुकाअध्यक्ष सुधीर राऊळ यांनी औषधसाठा पुरेसा उपलब्ध करून द्या अशी मागणी केली डॉ. पाटील म्हणाले की धोबी ची आवश्यकता आहे कपडे धुण्यासाठी परंतु ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायला कोणी तयार होत नाही कारण ऑपरेशन थेटर मध्ये डॉक्टरांना कपडे वॉशिंग मशीन मधले घातलेले कपडे चालत नाही ते धुवावेत लागतात आणि ते स्वच्छ असावे लागत यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करत आहोत परंतु ते कॉन्ट्रॅक्ट द्यायला कोणी तयार होत नाही हे दुर्दैव आहे सर्वाधिक रुग्ण संख्या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी होते यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, माजी उपजिल्हाध्यक्ष ऍड अनिल केसरकर, उपतालुकाअध्यक्ष सुधीर राऊळ, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, एसटी परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, मळगाव शाखाध्यक्ष राकेश परब, उपशाखाअध्यक्ष पांडुरंग बुगडे तसेच डॉ. दुर्भाटकर, डॉ.वजराटकर आदी उपस्थित होते.

