*कोकण Express*
*डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे तळेरे येथे स्वच्छता अभियान : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचीत्य*
*कासार्डे ः संजय भोसले*
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे तळेरे येथील सदस्यांनी तळेरे ग्रामपंचायत परिसरातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केली. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

तळेरे ग्रामपंचायत परिसरातील तळेरे आरोग्य उपकेंद्र, रेशनदुकान, पशुवैद्यकीय दवाखाना आणि महावितरण कार्यालय परिसराची यावेळी साफसफाई करण्यात आली. या परिसरातील सुमारे 2 हजार किलो सुका कचरा व घाणीपासुन हा परिसर मुक्त करण्यात आला. या कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
यासाठी श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थीत होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय परिसर पुर्णपणे स्वच्छ करण्यात आला. याबद्दल तळेरे सरपंच आणि ग्रामपंचायतकडून सर्व सदस्यांचे आभार मानन्यात आलेत.

