*कोकण Express*
*केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी घेतली सदिच्छा भेट*
केंद्रीय पतन, परिवहन, जलमार्ग व पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भाजपाचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी सदिच्छा भेट घेतली. पणजी येथे त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांची भेट घेत पर्यटनाबाबत चर्चा केली. तर पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाबाबत देखील अजय गोंदावळे यांनी त्यांच लक्ष वेधल आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून देखील अजय गोंदावळे यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, त्यांची कन्या अंकिता गोंदावळे आदि उपस्थित होते.

