आचऱ्यातील रामेश्वर सोसायटीवर भाजप पुरस्कृत पॅनेलचे वर्चस्व

आचऱ्यातील रामेश्वर सोसायटीवर भाजप पुरस्कृत पॅनेलचे वर्चस्व

*कोकण Express*

*आचऱ्यातील रामेश्वर सोसायटीवर भाजप पुरस्कृत पॅनेलचे वर्चस्व…*

*शिवसेना पॅनेलचा उडविला धुव्वा ; यापुढील निवडणुकीतही यश मिळविण्यासाठी असेच प्रयत्न करा- चिंदरकर…*

*आचरा ःःप्रतिनिधी* 

श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आचरा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित सहकार पॅनेलने नाट्यमय घडामोडीनंतर तेराही जागांवर बाजी मारत निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत भाजपने आपली निर्विवाद सत्ता आणत शिवसेनेला जोर का झटका दिला आहे.

१३ उमेदवारासाठी झालेल्या निवडणुकीत सुरवातीस भाजप पुरस्कृत १२ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. शिवसेनेचा १ उमेदवार एका मताने विजयी झाला होता. मात्र भाजप पुरस्कृत उमेदवाराने फेरमोजणीची मागणी केल्यानंतर दोनदा झालेल्या फेरमोजणीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. भाजपने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन केला. या विजयानंतर विजयी उमेदवारांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

भाजपप्रणित सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. यामध्ये प्रिया आचरेकर ३२६ मते, समीर बावकर ३२१ मते, प्रफुल्ल घाडी ३३८ मते, अवधूत हळदणकर ३४० मते, लवू मालंडकर ३३७ मते, संतोष मिराशी ३२७ मते, प्रशांत पांगे ३२९ मते, धनंजय टेमकर ३६७ मते, लक्ष्मण आचरेकर ३४९ मते, डॉ. प्रमोद कोळंबकर ३७७ मते, निशा गावकर ३४२ मते, मनाली तोंडवळकर ३०४ मतांनी विजयी झाले. शिवसेना पुरस्कृत विनायक परब २९१ यांनी भाजप पुरस्कृत भिकाजी कदम २९० यांचा एका मताने पराभव करत निवडून आल्याचे जाहिर झाल्यावर त्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत फेर मोजणीची मागणी केली. यात विनायक परब यांचे एक मत कमी होत त्यांना २९० मते मिळाली तर भिकाजी कदम यांची दोन मते वाढून २९२ मते मिळवून निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकृष्ण मयेकर यांनी काम पाहिले. या निवडीनंतर भाजप तर्फे आचरा तिठा येथे जल्लोष करण्यात आला.

या विजयानंतर बोलताना तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी हा विजय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परीश्रमाचा असून कार्यकर्त्यांनी या विजयाचा उन्माद डोक्यात न घेता भविष्यातील येवू घातलेल्या निवडणूका जिंकण्यासाठी सर्वांनी असेच प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस, निलिमा सावंत, महेश हडकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर, संतोष गांवकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, जयप्रकाश परुळेकर, देवेंद्र हडकर, उदय घाडी, विजय कदम यांसह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!