शिवरायांची प्रेरणा सर्वांनी घ्यावी :संदेश पारकर

शिवरायांची प्रेरणा सर्वांनी घ्यावी :संदेश पारकर

*कोकण Express*

*शिवरायांची प्रेरणा सर्वांनी घ्यावी :संदेश पारकर*

*शिवसेना तालुका कणकवली आयोजित शिवजयंती उत्सव साजरा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली 19 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. शत्रुविरूद्ध लढा देताना गनिमी काव्याचा वापर करत त्यांनी स्वराज्य स्थापन केले. राजा जो रयतेसाठी जगला अशा या शिवरायांची प्रेरणा सर्वांनी घ्यावी असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.

कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तदपूर्वी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास संदेश पारकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी फटाके फोडत शिवप्रेमिनीं ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणा दिल्या. तसेच विशेष म्हणजे याठिकाणी गड किल्ल्याचा इतिहास सांगणारा प्रतीकात्मक किल्ला उभारण्यात आला होता. सायंकाळी पटवर्धन चौक ते शिवसेना कार्यालयापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला प्रमुख निलम सावंत-पालव ,जि.प.सदस्या स्वरूपा विखाळे, कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री, नगरसेवक कन्हैया पारकर, अँड. हर्षद गावडे,राजू राठोड,संतोष परब,जय शेट्ये,प्रसाद अंधारी,अमित मयेकर,सोमा गायकवाड,वैभव मालंडकर,सुनील पारकर,सचिन आचरेकर,प्रतीक्षा साटम,दिव्या साळगावकर,बंडू ठाकूर,संतोष पुजारे,रुपेश आमडोस्कर,चेतन अंधारी,महेश कोदे,चेतन मुंज,आदित्य सापळे आदी पदाधिकारी,शिवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!