माणगाव उपसरपंच पदी भाजपचे युवा नेतृत्व दत्ता कोरगावकर यांची बिनविरोध निवड

माणगाव उपसरपंच पदी भाजपचे युवा नेतृत्व दत्ता कोरगावकर यांची बिनविरोध निवड

*कोकण Express*

*माणगाव उपसरपंच पदी भाजपचे युवा नेतृत्व दत्ता कोरगावकर यांची बिनविरोध निवड*

*युवा नेतृत्वाला संधी दिल्याने युवा वर्गात उत्साहाचे वातावरण जल्लोषासाठी मोठ्या संख्येने युवा वर्ग होते उपस्थित*

*कुडाळ ः  प्रतिनिधी*

माणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्ता कोरगावकर यांची बिनविरोध निवड झाली भाजपचे उपसरपंच श्रावण धुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

या रिक्त जागेवर पक्षाच्या फाॅर्रम्युल्यानुसार आज रितसर निवडणूक झाली.15 सदस्य संख्या असलेल्या माणगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आहे.

डिसेंबर 2017 मध्ये जोसेफ डाॅन्टस हे थेट जनतेतून निवडून आले होते. यानंतर सचिन धुरी हे पहिल्या दोन वर्षासाठी उपसरपंच झाले होते.यानंतर सचिन धुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रावण धुरी हे विराजमान झाले होते.

दुसरा दोन वर्षासाठी श्रावण धुरी उपसरपंच झाले होते. शेवटच्या टप्प्यामध्ये श्रावण धुरी यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामा दिला होता. आणि या जागेसाठी आता आज निवडणूक होत आहे.त्यामुळे शेवटच्या एक वर्षासाठी हे पद दत्ता कोरगावकर यांना मिळाले आहे. दत्ता कोरगावकर हे प्रभाग चार मधून निवडून आले असून उमदा व युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.ही निवडणूक बिनविरोध झाली.कारण शिवसेनेच्या वतीने कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. दुपारी दोन वाजता सरपंच जोसेफ डाॅन्टस यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आणि यावेळी ही निवड सरपंच जोसेफ डाॅन्टस यांनी घोषित केली.

यावेळेस रणजित देसाई,सरपंच जोसेफ डाॅन्टस,मोहन सावंत,पप्या तवटे,रूपेश कानडे,नूतन उपसरपंच दत्ता कोरगावकर, माजी उपसरपंच श्रावण धुरी, माजी उपसरपंच सचिन धुरी,पांडुरंग कोंडसकर,दिपक काणेकर,महेश भिसे,देवता नाईक,कामिनी भर्तू,बाबू पालव,दिपक नानचे,मनिषा भोसले,रोहिणी मुंज,प्रणाली जोशी,मेघना पावसकर,वैभव परब,एकनाथ धुरी,संदीप नार्वेकर,आनंद केरकर,वैभव कोंडसकर,युवा सेनेचे योगेश धुरी,प्रथमेश बोगार,सिद्धेश कुडतरकर,अजित भिसे,रूपेश धारगळकर,सत्यम केरकर,प्रसाद नार्वेकर,अवीनाश राणे,ग्रामविकास अधिकारी विलास कोलते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!