सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश डोंगरे यांचे निधन

सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश डोंगरे यांचे निधन

*कोकण  Express*

*सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश डोंगरे यांचे निधन*

*कनेडी ः  प्रतिनिधी*

नाटळ बेडमवाडी येथील रहिवाशी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी (ए सी पी )सुरेश अंकुश डोंगरे ( ७० ) यांचे गुरुवार दि . १० फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , विवाहित तीन मुलगे ,सुना , नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार मिलिंद डोंगरे यांचे काका , मुंबईस्थित शिवसेना पदाधिकारी आकाश डोंगरे यांचे काका व नेव्हीतील निवृत्त अधिकारी रमेश डोंगरे यांचे ते भाऊ होते. सुरेश डोंगरे यांची पोलीस खात्यात कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख होती. गुन्हेगारी दुनियेत त्यांची मोठी वचक होती .मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्यात त्याचा मोठा सहभाग होताा. त्या मुळे त्यांना अनेक पदके बहाल करण्यात आली होती . त्यांच्या प्रेत यात्रेत सामाजिक, राजकीय मंडळी सहभागी झाली होती .येथील समशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!