वैभव रावराणे नामक व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही

वैभव रावराणे नामक व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही

*कोकण Express*

*वैभव रावराणे नामक व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही*

*वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ बाळा चव्हाण*

 

 

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

तालुक्यातील वैभव रावराणे नामक व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही. त्याला पक्षात प्रवेश दिलेला नाही. आणि देणारही नाही. अशी प्रतिक्रिया वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ बाळा चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी रावराणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या सोबत फोटो काढत ते सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. या फोटोवर विश्वास ठेवून वैभव रावराणे यांच्याशी कोणीही आर्थिक व्यवहार व अन्य कोणतेही व्यवहार करू नयेत. केल्यास त्याचा कोणताही संबंध पक्षाचा राहणार नाही असे पत्रकात चव्हाण यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!