*कोकण Express*
*कणकवलीतील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी १८ रोजी नगरपंचायत मध्ये बैठक*
कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर बुधवार १८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता नगराध्यक्ष दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या बैठकीत संबंधित खाते प्रमुख उपस्थित असणार आहेत. यावेळी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त बाबत काय उपाययोजना करता येतील याची चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली.