वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी ८२.६५ टक्के मतदान झाले

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी ८२.६५ टक्के मतदान झाले

*कोकण  Express*

*वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी ८२.६५ टक्के मतदान झाले*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी ८२.६५ टक्के मतदान झाले आहे.चार प्रभागातील एकूण ३९२ मतदारांपैकी ३२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.यात १६१ स्ञी मतदारांनी तर १६३ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वात जास्त मतदान मतदान प्रभाग क्र. ५ मध्ये ८७.१६ तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. ३ मध्ये ७४.१९ टक्के झाले आहे.
४ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वा.पासून पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली.शहरात ४ प्रभागासाठी ४ मतदान केंद्रावर मतदान झाले.मतदाना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्राबाहेर तसेच संपूर्ण शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतदान केंद्र निहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
प्रभाग क्र.३ मध्ये एकूण ९३ पैकी ६९ मतदारांनी मतदान केले.सरासरी ७४.१९.टक्के मतदान झाले आहे.
प्रभाग क्र.५ मध्ये १०९ मतदारांपैकी ९५ मतदारांनी मतदान केले.८७.१६ टक्के मतदान झाले आहे.
प्रभाग क्र.१५ मध्ये ८६ पैकी ७३ मतदारांनी मतदान केले आहे.८६.३६ टक्के मतदान झाले आहे.
प्रभाग क्र.१६ मध्ये १०४ पैकी ८७ मतदारांनी मतदान केले.८३.६५ टक्के मतदान झाले आहे. संपूर्ण मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!