शिरोडा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राजन गावडेंची बिनविरोध फेरनिवड

शिरोडा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राजन गावडेंची बिनविरोध फेरनिवड

*कोकण  Express*

*शिरोडा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राजन गावडेंची बिनविरोध फेरनिवड…*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

शिरोडा विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी राजन गावडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान या निवडीबद्दल वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश परब यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या सोसायटीच्या व्हाइस चेअरमन पदी सौ शितल राजेश साळगांवकर यांची निवड करण्यात आली. आज  कोविड नियमांचे नियम पाळून शिरोडा विकास सेवा सोसायटी ची निवडणूक पार पडली.

यावेळी सोसायटीचे सर्व संचालक श्री दत्तगुरु परब,तुकाराम परब, विजय पडवळ, दिगंबर गावडे, दिलीप मठकर, राजू अंदुरलेकर, रेशमी डीचोलकर, दिपश्री गावडे, शिवराम मयेकर उपस्थित होते. या निवडणूक प्रक्रियेत निरीक्षक म्हणून श्री एस एल कावळे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!