सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर अनेक ठिकाणी गॅप

सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर अनेक ठिकाणी गॅप

*कोकण Express*

*पादचारी गटारात पडून एकजण जखमी…!*

*सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर अनेक ठिकाणी गॅप..!*

पदपथाच्या दुरुस्तीच्या मागणीकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष…!

*कणकवली ः संंजना हळदिवे*

शहरातील सर्व्हिस रोडलगत गटारकमपदपथ दोन्ही बाजूच्या साईटला म बांधण्यात आले आहेत. मात्र याची निगा व दुरुस्ती न केल्यामुळे पदपथाची दुरवस्था झाल्याने तो धोकादायक बनला आहे. सोमवारी रात्री या पदपथावरून पादचारी चालत असताना सिमेंट क्राँकिटीकरणाच्या झाकणातील राहिलेल्या गॅपमुळे त्याचा पाय गटारात अडकल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच गटारकम पदपथची दुरुस्ती करण्याबाबत संबंधितांना जाग येणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

शहरातील सर्व्हिस रोडलगत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व पदाचार्‍यांना चालता यावे यासाठी गटारकमपदपथ बांधण्यात आले. सध्या या पदपथाची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पदपथावरील सिमेंट क्राँकिटीकरनाच्या झाकणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून सिमेंट निखळून आतील लोखंडी सळ्या उघडल्या पडल्या आहेत. त्यामुळे पदपथावरून चालणे पादचार्‍यांसाठी धोकादायक बनले आहे. गटारकम पदपथाच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग ठेकेदार यांचे लक्ष वेधून पदपथची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. मात्र या मागणीला संबंधितांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले गेले.त्यानंतर नागरिकांनी ही बाब लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधितांना गटारकम पदपथची दुरुस्ती करण्याबाबत सूचना केली होती. मात्र, अद्यापही संबंधितांनी याबाबत कोणताही कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!