जिल्हा बँक निवडणुकीनंतर कणकवली सोसायटी बिनविरोध!

जिल्हा बँक निवडणुकीनंतर कणकवली सोसायटी बिनविरोध!

*कोकण Express*

*जिल्हा बँक निवडणुकीनंतर कणकवली सोसायटी बिनविरोध!*

*भाजपा – शिवसेना – काँग्रेस’च्या संचालकांची बिनविरोध निवड!*

*चेअरमन पदी अडीच – अडीच वर्षाचा फॉर्म्युला!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अडीच – अडीच वर्षाच्या चेअरमन पदाच्या फॉर्म्युल्यावर ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या निवडणुकीत संचालकपदी सुशील पारकर, विठ्ठल देसाई, मनोहर राणे, सत्यवान परब, जिजी राणे, चंद्रशेखर राणे, रुपेश आमडोसकर, रवींद्र गावडे, माधवी राणे, सुरेखा ताटे, शालन पवार, प्रदीप मांजरेकर, मधुकर कदम यांची बिनविरोध निवड झाली. आहे या निवडीबद्दल संचालक मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या निवडीत भाजपचे सात तर शिवसेना व काँग्रेस मिळून सहा संचालक बिनविरोध देण्यात आले. जिल्हा बँक निवडणुकीत सहकार क्षेत्रात निर्माण झालेले राजकारण व या निवडणुकीनंतर मात्र शिवसेना – भाजप – काँग्रेस एकत्र येत केलेली बिनविरोध निवडणूक पाहता जनतेमध्ये सुद्धा या सोसायटीच्या बिनविरोध निवडीची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!