पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांच्या स्मृतींना कणकवलीकरांनी पद्मश्री अभिवादन

पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांच्या स्मृतींना कणकवलीकरांनी पद्मश्री अभिवादन

*कोकण Express*

*पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांच्या स्मृतींना कणकवलीकरांनी पद्मश्री अभिवादन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील सर्व रिक्षा मालक चालक आणि “आपण आहात म्हणून आम्ही ” या समस्त ग्रुप च्या वतीने तसेच पोलीस दलातील मित्र यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सिंधुताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.
या प्रसंगी जेष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर यांनी विचार व्यक्त केले “सिंधुताई सकपाळ या स्वत:च अनाथ होत्या, त्यांनी हजारो अनाथ मुलांना हात देऊन जगण्यास व मोठे होण्यास साहाय्य केले. आणि त्या भारतीय वंशाच्या होत्या याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आणि त्यांचा आदर्श मानून त्यांनी उभी केलेली अनाथ मुले त्यांची चळवळ पुढे नेणार आहेतच, पण समाजातील इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी असे केले तर ती त्यांना खरी आदरांजली ठरेल असे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!