*कोकण Express*
*शहराचा विकास करू पाहणाऱ्या उमेदवारांनाच देणार शिवसेनेतून उमेदवारी- अतुल रावराणे….*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या आगामी निवडणूकीसाठी शिवसेनेकडून वैभववाडीच्या विकासाचे स्वप्न पहाणा- या उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार आहे.कोकणावर शिवसेनेचे प्रेम आहे.शिवसेनेच्या माध्यमातून वैभववाडी शहराचा विकास करणार.असे प्रतिपादन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले.
भैरी भवानी प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत रावराणे बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, बंडु मुडले, विजय रावराणे, महेश रावराणे, राजू पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावराणे म्हणाले वैभववाडी नगरपंचायतीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे.वैभववाडी शहराच्या सर्वांगीन विकासासाठी शिवसेनेकडून वैभववाडी शहराच्या विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना पालकमंञी उदय सामंत, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन उमेदवारी देण्यात येणार आहे.वैभववाडी शहरातील मुलभूत सेवा सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे.वैभववाडी समृद्ध करणारी स्वप्न पहाणा-या उमेदवारांना उमेदवारी देणार असल्याचे रावराणे यांनी सांगितले .
तसेच साध्या राज्यात महाविकास आघाडी एकञ आहे.त्यामुळे आगामी निवडणूका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न राहील.माञ याबाबत अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येणार आहे.असेही ते म्हणाले.
कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी धडक कामगार युनियन देशभरामध्ये कामगारांच्या प्रश्नांवर काम करीत आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत राणे या संघटनेचे नेतृत्व करीत आहेत.आपण या संघटनेच्या उपाध्यक्षपदी काम करीत असून लवकरच या संघटनेचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम सुरु करण्यात येणार आहे.अशी माहीती रावराणे यांनी दिली.
या संघटनेच्या माध्यमातून अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिवाळी निमित्त १०.हजार धान्यांची कीट कामगारांसाठी दिले आहेत.