*कोकण Express*
*सावंतवाडी व जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा*
*पत्रकारांनी बातमीच्या माध्यमातून “पाॅझिटिव्ह” शक्ती देण्याचे काम करावे ;दिपक केसरकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
बातमीमध्ये “पॉझिटिव्ह” शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. तशी पत्रकारिता करून प्रेरणा देण्याचे काम पत्रकारांनी करावे, त्याचा फायदा निश्चितच समाजाला होऊ शकतो, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले. दरम्यान कोरोनाच्या काळात जीवाची परवा न करता सिंधुदुर्गातील पत्रकारांनी चांगले काम केले आहे. त्यांचे हे योगदान कधीही न विसरले जाणारे आहे, असेही श्री.केसरकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड राजेंद्र रावराणे,मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,सभापती अंकुश जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,उमेश तोरस्कर संतोष सावंत,सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, प्रसन्ना राणे,रामचंद्र कुडाळकर,हरिश्चंद्र पवार,राजेश मोंडकर, अभिमन्यू लोंढे, कोकणसादचे संपादक सागर चव्हाण, उज्वल नारकर, रमेश घोगळे, उमेश सावंत नरेंद्र कोलते, गणपत चव्हाण,भगवान लोके,ऊत्तम नाईक,सचिन रेडकर, आप्पा मालवणकर, विलास कुडाळकर,स्वप्निल उपरकर,प्रमोद म्हाडगुत, स्नेहल पेडणेकर, जतीन भिसे, संजय पटेकर, तुषार सावंत,लक्ष्मीकांत भावे,एकनाथ तावडे,महेश पांचाळ,दाजी नाईक, विजय देसाई, नागेश पाटील, आप्पा परब,के. जी. गावडे,योगेश तांडेल, एस.एस धुरी,अजय गडेकर, रजनीकांत कदम, वासुदेव देऊळकर, मंगेश तळवणेकर, रवी जाधव,वैभव साळकर,तेजस देसाई, प्रशांत सावंत,सूर्यप्रकाश दळवि,मनीष चव्हाण,संतोष गावडे,मोहन जाधव, रोहन गावडे, हर्षल नारकर, विनायक गावस, वैभव वालावलकर,सत्यजित धारणकर, मयुर चराटकर, सुहास देसाई, सतीश पाटणकर,वसंत केसरकर, बाळा खडपकर, देवयानी वरेरकर, नंदकिशोर महाजन,एकनाथ पवार,आनंद लोके,सीमा मटकर, संदीप देसाई, संजय वालावलकर, अजय सावंत, नितीन कदम,भरत सातोस्कर, प्रदीप सावंत,रामदास पारकर,जयवंत गवस,संतोष वायंगणकर, अनिल भिसे, शुभम धुरी,निखिल माळकर, योगिता बेळगावकर, पायल बनसोडे, आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांची कामगिरी उल्लेखनीय आहे. या जिल्ह्यातील पत्रकारितेला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा लाभला आहे. याच पार्श्वभूमीवर दर्पणकार जांभेकर यांच्या नावे स्मारक रुपी भव्य पत्रकार भवन सिंधुदुर्गनगरीत उभे राहत आहे. दरम्यान येथील पत्रकारांनी सुद्धा त्याला साजेसे असे काम करावे, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना श्री. जेठे म्हणाले, सिंधुदुर्ग नगरीत उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाला सर्वांचेच विशेष योगदान लाभले आहे. यात सुरुवातीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आम्हाला जागा उपलब्ध झाली. त्यानंतर आमदार दीपक केसरकर राज्यमंत्री असताना त्यांनी या भवनासाठी निधी उपलब्ध करून दिला, तर माजी जिल्हाध्यक्षांसह सर्वच ज्येष्ठ पत्रकारांनी हे स्मारक होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी ॲड.रावराणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांची पत्रकारिता नेहमीच निपक्षपाती व निर्भीड राहिली आहे. त्यांनी असेच योगदान यापुढेही सुरू ठेवावे. पत्रकार हा एक समाजाचा आवाज आहे. त्यामुळे आपल्या लेखणीतून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्याचबरोबर आज लोकशाहीचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा पत्रकारांवर आहे. आतापर्यंतच्या पत्रकारांनी ती योग्य रित्या हाताळली आहे. त्यांचा वारसा नवोदित पत्रकारांनी सुद्धा पुढे न्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेश मोंडकर, प्रास्ताविक उमेश तोरसकर, तर आभार सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी मानले. याप्रसंगी विशेष सहकार्य केल्याबद्दल ब्रेकिंग मालवणीच्या योगिता बेळगावकर हीचा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

