मुख्यालय पत्रकार संघ आणि माहिती कार्यालयाच्यावतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

मुख्यालय पत्रकार संघ आणि माहिती कार्यालयाच्यावतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

*कोकण Express*

*मुख्यालय पत्रकार संघ आणि माहिती कार्यालयाच्यावतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन*

*सिंधुदुर्गनगरी ता.०६-:*

मुख्यालय पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

यावेळी स्वागत प्रास्ताविक श्री. वालावलकर यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी पत्रकार दिनाविषयी माहिती दिली. स्मार्टफोनच्या डिजीटल वेगवान युगात आजही लिखीत स्वरुपातील पत्रकारीता, वृत्तपत्रांची विश्वासाहार्यता टिकून असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, पत्रकार महिला उत्कर्ष समिती कुडाळच्या अध्यक्ष दीपा ताटे, सचिव तन्वी सावंत, सदस्य दिप्ती चव्हाण, नेहा परब यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण, मुख्यालय पत्रकार संघाचे सचिव नंदकुमार आयरे, सदस्य विनोद दळवी, संदीप गावडे, प्रसाद पाताडे, विनोद परब आदी उपस्थित होते. शेवटी बाळ खडपकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!