*कोकण Express*
*नाईक कंपनीच्या कुरघोडीच्या राजकारणाचा बळी सतीश सावंत – संतोष कानडे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कालच सुशांत नाईक यांनी केलेल्या टीकेवर आमचे जिल्हाध्यक्ष श्री. राजन तेली यांच्या वक्तव्यावर बोलताना कानडे म्हणाले, जर नाईक अस म्हणत असतील कि, राजन तेली साहेब हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत , सुरेश दळवी, माणगावकर इत्यादी पॅनलचे लोक निवडून आले नाही हा कशाचा संकेत होता? त्यामुळे नाईक कंपनीने सतीश सावंत यांना विधानसभेच्या उमेदवारीबाबत पण side track केले एवढे मात्र नक्कीच……. दुसरे सांगायचे झाले तर, जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सतीश सावंत यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला होता त्यामुळे सुडाच्या भावनेतून वायंगणकर यांच्या माध्यमातून नाईक कंपनीने सतीश सावंत यांचा घात केला नसेल कशावरून?
पराभवाचे बोलत असाल तर, वैभव नाईक यांचे वडील यांना पण ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. वैभव नाईक, सतीश सावंत , संदेश पारकर हे नेते कितीवेळा पराभवाला सामोरे गेले याचे आत्मपरीक्षण नाईक कंपनीने करावे. आपण आपल्या विजयाची गाथा जनतेला सांगत असाल तर २२ वर्षानंतर आपल्या वडीलांच्या नावे मते मागायची वेळ तुमच्यावर का आली ? त्या सहानुभूती वर आपण निवडून आलात हे विसरू नका.
तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जर तुमच्यावर होता तर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राजन तेली साहेब यांच्या घरी का आले? ते नाईक कंपनीकडे का नाही आले ? त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर टीका करताना नाईक कंपनीने विचार करून बोलाल तर आपल्या कंपनीचे पुढील दिवस चांगले जातील असे वाटते.

