*कोकण Express*
*सोनाळी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे बाळकृष्ण बोभाटे यांची बिनविरोध निवड*
*शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी बोभाटे यांचा केला जाहीर सत्कार*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायत सोनाळी पोटनिवडणुकीमध्ये सोनाळी ग्रामपंचायत प्रभाग 2 मध्ये रिक्त झालेल्या जागेवर सोनाळी गावचे माजी सरपंच बाळकृष्ण बोभाटे यांनी शिवसेना पुरस्कृत अर्ज सादर केला होता. यावेळी सर्वांच्या वतीने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज शिवसेना कार्यालय वैभववाडी येथे शिवसेनेच्या वतीने सोनाळी गावचे नवनिर्वाचित सदस्य बाळकृष्ण बोभाटे यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, जि. प. सदस्य दिव्या पाचुगडे, माजी सभापती रमेश तावडे, माजी सभापती अंबाजी हुंबे, सोनाळी गावचे सरपंच भीमराव भोसले, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, रणजीत तावडे, संतोष पवार, शिवाजी राणे, नितीन शेलार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

