रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

*कोकण Express*

*रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित…*

*बांदा ः प्रतिनिधी*

रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श पोलीस पाटील सेवारत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गावातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्राबरोबरच शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्याऱ्या सौ. परब यांना आतापर्यंत शासनाच्या व सामाजिक संस्थांच्या विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करते. २०२० मध्ये सौ. परब याना आदर्श पोलीस पाटील सेवा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!