यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्र विद्या पदवी परीक्षेत पत्रकार पंकज मोरे उत्तीर्ण

*कोकण Express*

  1. *यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्र विद्या पदवी परीक्षेत पत्रकार पंकज मोरे उत्तीर्ण..*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मार्च सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या वृत्तपत्र पदवी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. या परीक्षेत दैनिक पुण्यनगरीचे वैभववाडी तालुका प्रतिनिधी पंकज मोरे यांनी ८० टक्के गुण मिळवित उत्तीर्ण झाले आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रावरील वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन पदवी परीक्षेत दैनिक पुण्यनगरीचे वैभववाडी तालुका प्रतिनिधी पंकज मोरे यांनी ८० टक्के गुण मिळवित उत्तीर्ण झाले आहेत. तर मंदार चोरगे ९० टक्के, तेजस्वीनी रावराणे ९१.५० टक्के गुण मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!