*कोकण Express*
*कणकवली येथे नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक) प्रतिवार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न*
*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दिनांक ११/१२/२०२१ रोजी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक) कणकवली येथे प्रतिवार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा समस्त व्यापारी बांधवांनी आयोजित केली होती,
त्यावेळी विविध कार्यक्रम आयोजित केले होते, महापुजनाच्या वेळी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता,
दुपारी नंतर सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री उदयजी सामंत यांचा सत्कार आमचे मार्गदर्शक श्री अशोक करंबेळकर (जेष्ठ पत्रकार) यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच श्री अशोक करंबेळकर यांचा सत्कार समस्त व्यापारी बांधवांच्या वतीने पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या हस्ते करण्यात आला,तसेच कणकवली शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला,
कणकवली तालुक्याचे पोलिस निरीक्षक माननीय श्री हुंदळेकर साहेब यांचाही सत्कार समस्त व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आला,रात्री भजन आयोजित करण्यात आले, त्यावेळी भजन सम्राट श्री भास्कर गावडे बुवा यांचाही सत्कार समस्त व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आला,
यावेळी आपल्या शहराचे लाडके युवा नेते माननीय श्री संदेशजी पारकर उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय श्री विकास भाई सावंत याप्रसंगी उपस्थित होते, त्यांचा हि व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आमचे व्यापारी बांधव एकत्र असल्याने च दरवर्षी करणे शक्य होते, त्यामुळे आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो.
आमच्या बाबा भालचंद्र महाराज यांच्या, श्री स्वयंभू रवळनाथ यांच्या आशिर्वादाने च शक्य होतात.
सर्व कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला सर्वांचेच सहकार्य लाभले आहे.सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून कार्य करत असताना आम्हाला सर्वांचे आशिर्वाद असतात.
उपस्थित होते, त्यांचा हि व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.