*कोकण Express*
*आरोंदा हायस्कूल चे विद्यमान मुख्याध्यापक अरूण विनायक धर्णे यांचा सेवानिवृत्ती निरोप व सत्कार समारंभ*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आरोंदा हायस्कूल चे विद्यमान मुख्याध्यापक अरूण विनायक धर्णे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप व सत्कार समारंभ आरोंदा हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयुक्त सहयोगातून हा समारंभ संपन्न झाला. यावेळी विचारमंचावर संस्था अध्यक्ष श्री गोपाळराव नाईक., उपाध्यक्ष बबनराव नाईक, सचिव भाई देऊलकर,सहसचिव अशोक धर्णे व संस्था पदाधिकारी श्री प्रशांत कोरगावकर, सौ, अनघा मेस्त्री, श्री अनिल आरोंदेकर, श्री सखाराम ठाकूर ,सत्कारमूर्ती अरूण धर्णे, सौ गीता धर्णे, भावी मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम सचिव भाई देऊलकर यांनी प्रास्ताविक केले व सर्व मान्यवरांचे स्वागत सिद्धार्थ तांबे यांनी अध्यक्षांच्या हस्ते केले. यानंतर अरुण धर्णे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक सत्कार संस्था पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आला .आरोंदा हायस्कूल कर्मचारी यांच्या वतीनेही सत्कार व सदिच्छा देण्यात आला. अरूण धर्णे यांची सुविद्य पत्नी सौ. गीता धर्णे यांचाही कर्मचारी वर्गाच्या वतीने साडी व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर शिक्षकांतून चंदन गोसावी, सौ. सुप्रिया कोरगावकर, ताराचंद राठोड, दिवाल्या वसावे, सिद्धार्थ तांबे व शाळेचे लिपिक श्री यादव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले . संस्था पदाधिकारी प्रशांत कोरगावकर, भाई देऊलकर यांनीही मुख्याध्यापक अरूण धर्णे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक धर्णे यांच्या कुटुंबियांतर्फे रुपेश धर्णे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.शेवटी संस्थाध्यक्ष गोपाळराव नाईक यांनी मनोगत व सत्कारपर शुभेच्छा दिल्या.यानंतर भावी मुख्याध्यापक म्हणून सिद्धार्थ तांबे यांच्या नावाची अधिकृत घोषणा संस्था अध्यक्ष गोपाळराव नाईक यांनी केली व संस्था व शिक्षक यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी चंदन गोसावी यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो ओळ– सेवानिवृत्त धर्णे शिक्षकांचा सत्कार करताना मान्यवर
