संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात २१ युनिट रक्त संकलन

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात २१ युनिट रक्त संकलन

*कोकण  Express*

*संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात २१ युनिट रक्त संकलन*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे संपूर्ण भारतवर्ष मध्ये रक्तदान शिबिर राबविले जातेे त्याचाच भाग म्हणून १८ नोव्हेंबर २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ब्रँचमध्ये मातोश्री मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये २१ युनिट रक्त संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन डाॅ. श्रीनिवास बेळणेकर (वैदयकीय अधिकारी, रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय,सिंधुदुर्ग) यांच्या हस्ते करणेत आले. ” खून नालियो मे नही नाडीयो मे बहे “। असा संदेश निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी निरंकारी भक्तांना दिला . अन १९८६ पासून हा सातत्यपूर्ण उपक्रम आजही निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून अविरत चालू आहे .सदर कार्यक्रमाला रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय,सिंधुदुर्ग टीमचे सहकार्य लाभले यावेळी कणकवली सेक्टर संयोजक विलास जाधव व कणकवली,ओरोस,कुडाळ येथील निरंकारी भक्त, नागरिक उपस्थित होते. सेवादल यु.नं.७७२ चे संचालक महेश पांचाळ यांच्या मार्गदर्शनामध्ये शिबिर यशस्वीतेसाठी सेवादलच्या बंधु भगिणीनी निष्काम भावनेने सेवा करत मोलाचे योगदान दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!