*कोकण Express*
*▪️साकवांच्या रखडलेल्या निविदा प्रक्रिये वरून सदस्य आक्रमक*
*▪️निविदा उघडल्या गेल्या नाहीत तर उपोषणाला बसणार असा इशारा*
ओसरगाव, वागदे मधील मंजूर सकवा बाबत काय झालं? निविदा अजून का खुल्या केल्या जात नाहीत? असा सवाल करत पंचायत समितीच्या बैठकीत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून डीपीडिसी ने या बाबत अहवाल मागविला त्यांच्याकडून सूचना आल्यावर निविदा खुल्या करणार असे स्पष्ट केले. या संदर्भात डीपीडिसी चा संबंध काय? कामाला मंजुरी देणे, कामे निवडणे व प्रशासकीय मान्यता देणे हे डीपीडीसी चे काम आहे. असा मुद्दा सभापती मनोज रावराणे यांनी मांडला. या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली म्हणून पत्रव्यवहार केला. पण अनियमितता झाली तर 8 महिने थांबलात का? असा सवाल मेस्त्री यांनी केला. डीपीडिसी बैठकीपूर्वी या निविदा उघडल्या गेल्या नाहीत तर आम्ही उपोषणाला बसणार. जाणून बुजून दबावामुळे हे लांबवल जातंय असा आरोप मिलींद मेस्त्री यांनी केला. गेल्या मिटींगला विषय घेऊनही निर्णय होत नाही. ग्रामस्थ प्रश्न विचारतात. असे सांगत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

