शालेय एसटी बस फेर्‍या तात्काळ सुरू कराव्यात

शालेय एसटी बस फेर्‍या तात्काळ सुरू कराव्यात

*कोकण Express*

*शालेय एसटी बस फेर्‍या तात्काळ सुरू कराव्यात*

*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे मागणी*

*तळेरे ः  प्रतिनिधी*

कोरोना कालावधीत शालेय एसटी बस फेर्‍या बंद होत्या. त्या ताबडतोब सुरू कराव्यात, या आग्रही मागणीसाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना कालावधीत शालेय एसटी फेर्‍या बंद होत्या. त्या ताबडतोब सुरू कराव्या. त्याचप्रमाणे अवैध प्रवासी वाहतूक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य एसटी आगार मधील समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ भाई पीरखान तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अमेय मोरे, कणकवली तालुका सदस्य मनोज वारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!