*सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंट केटर्स असोसिएशन यांच्या वतीने ओरोस शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन…*
*जिल्हा परिषदेचे गटनेते श्री रणजीत देसाई यांनी दिली भेट…*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंट केटरर्स असोसिएशन यांच्यावतीने शासनाच्या धोरणाविरुद्ध ओरोस येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई यांनी भेट घेऊन त्यांच्या विविध प्रश्नांबद्दल माहिती घेतली व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्यावतीने पाठिंबा जाहीर केला. यावेळी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रणय तेली, उपाध्यक्ष आबा कोटकर, सेक्रेटरी गौरव मुंज, विठ्ठल नाटा, मिलिंद धुरी, नितीन सामंत,विशाल चव्हाण, नीलेश काणेकर, अमृत काणेकर, नागेश नेमळेकर, योगेश ताम्हाणेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, खासदार नारायणराव राणे व आमदार नितेशजी राणे यांच्या माध्यमातून राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडे त्यांच्या विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आगामी सभेमध्ये त्याबाबत आवश्यक ते ठराव करून शासनाकडे कार्यवाहीसाठी पाठवणार असल्याचे देखील सांगितले. त्यांच्यासोबत नगरसेवक सुनील बांदेकर, पावशी माजी सरपंच पप्या तवटे व अन्य उपस्थित होते.