कणकवली शहरात 8 दिवसांत 70 जणांचा वीजपुरवठा केला खंडित

कणकवली शहरात 8 दिवसांत 70 जणांचा वीजपुरवठा केला खंडित

*कोकण Express*

*कणकवली शहरात 8 दिवसांत 70 जणांचा वीजपुरवठा केला खंडित…!*

*थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने घेतली अ‍ॅक्शन…!*

*वीज बिल थकबाकीदारांचे धाबे दणाणले…!*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

महावितरणच्या कणकवली विभागातील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणाच्या अधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. कणकवली शहरात 8 दिवसांत 70 जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. महावितरणाच्या अ‍ॅक्शनमुळे बिल न भरलेल्या ग्राहकांची धाबे दणाणले आहेत. कणकवली शहरातील 1 कोटी 53 लाख रुपये थकबाकी पैकी 94 लाख रुपये वसूली झाली असून अजूनही 59 लाख रुपये वसुली होणे बाकी असल्याचे कणकवली शहराचे सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांनी सांगितले. कणकवली शहरातील थकीत विद्युत ग्राहकांनी लवकरात लवकर विज बिल भरून आपला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवत महावितरणला सहकार्य करावे,असे आवाहन कणकवली शहराचे सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!